कविवर्य वसंत बापट यांची आज जयंती. विविध क्षेत्रांमधे लीलया संचार करू शकणारी प्रतिभा होती त्यांची. आणि काव्यदेखील सर्वसामान्यांच्या मनाची पकड घेणारं, साधं-सोपं. अत्यंत लोकप्रिय कवी.
त्यांच्या जयंतीदिनी त्यांची आठवण काढावी हे तर झालंच. पण ते पुरेसं नाही. निदान या दिवशी तरी त्या साहित्यिकाच्या साहित्याचा आस्वाद घेतला पाहिजे आपण. तेव्हा, आज त्यांनी लिहिलेली एखादी झकास कविता अवश्य वाचा.
गगन सदन तेजोमय हे गाणं तुम्ही नक्की ऐकलं असेल. या अत्यंत लोकप्रिय गीताचे गीतकार आहेत वसंत बापट.
१९६२साली जेव्हा भारत-चीन युद्ध पेटलं होतं तेव्हा देशप्रेमाने आणि शौर्याने भरलेलं एक गाणं मराठी माणसांच्या मनावर गारूड करत होतं — उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू. आणि हे गाणं लिहिणारा कवी, वसंत बापट.
सदैव सैनिका पुढेच जायचे सारखं स्फूर्तीगीत लिहिणारे पण वसंत बापट आणि फुंकर सारखी हळुवार कविता लिहिणारेदेखील तेच, वसंत बापट.
पण वसंत बापट हे काही त्यांचं खरं, मूळ नाव नव्हे. काय होतं त्यांचं खरं नाव?
दुसरं काही वाचावं असं वाटतं आहे का? हे आहेत प्रसिद्ध झालेले अन्य काही ताजे लेख:



