Categories
आम्हांविषयी सर्वांसाठी

नमस्कार मंडळी, सुस्वागतम्

नमस्कार मंडळी. ‘शब्दांचीच रत्ने’मधे तुम्हां सर्वांचं हार्दिक स्वागत. हा लेख म्हणजे जणू या सगळ्या उपद्व्यापाची ओळख आहे बरं का. ‘शब्दांचीच रत्ने’ म्हणजे काय, कुठेकुठे सापडतात ही रत्नं, या सगळ्याची सुरुवात कधी झाली अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना, मग वाचा हा लेख.


मराठी हा आपल्या सगळ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. या आपल्या भाषेबाबत २०१८ साली ‘साप्ताहिक लोकप्रभा’मधे मी एक सदर लिहित होतो — ‘शब्दांचीच रत्ने’. उदंड प्रतिसाद मिळाला त्या लेखमालेला.

पण हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा या विचाराने हा ब्लॉग चालू केला आहे. इथे नेमकं काय सांगणार आहोत आपण ते सांगितलं पाहिजे. त्याचं एका वाक्यात उत्तर, ‘मराठीविषयी सारं काही’ असं आहे. मग ते भाषेची सद्यस्थिती असो किंवा भाषेतल्या गंमतीजंमती किंवा भाषेत घुसणाऱ्या किंवा घुसू पाहणाऱ्या चुका. आणि हे सगळं क्लिष्टपणा टाळून.

इथे दररोज नवं काहीतरी असेल. तेव्हा रोज यायचं इथे. आणि करायची धमाल. तेव्हा उद्या पुन्हा भेटू इथेच. याच वेळी. तोपर्यंत, अलविदा!